Thursday, March 7, 2024

महिलांचे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे
वाणिज्य विभाग आणि उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माण देशी फाउंडेशन यांच्या सहकार्याने महिलांचे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत डॉ. उदय लोखंडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. या प्रसंगी माण देशी फाउंडेशनच्या वतीने फील्ड ऑफिसर शितल बर्गे उपस्थित होत्या. प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संदीप लोखंडे, सूत्रसंचालन B.Com. III मधील विद्यार्थीनी कू धनश्री काटकर, तर आभार प्रा. कुलदीप सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यशाळेच्या नियोजनात प्रा. किशोरी कोळपे यांचे सहकार्य लाभले.


Facebook Link One Day Workshop 

No comments:

Post a Comment