Sunday, September 28, 2025

वाणिज्य विभागामार्फत “GST 2.0” भित्तीपत्रिका सादर

 वाणिज्य विभागामार्फत “GST 2.0” भित्तीपत्रिका सादर 

आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे येथे दि 24 सप्टेंबर 2025 रोजी वाणिज्य विभागामार्फत बी.कॉम. भाग–दोनच्या विद्यार्थ्यांनी “GST 2.0” या विषयावर तरंगभित्तिपत्रिका सादर केली.

या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन सातारा जिल्हा युवा अधिकारी माननीय श्री. स्वप्निल देशमुख यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय श्री. स्वप्निल देशमुख यांनी जीएसटीविषयक आर्थिक धोरणात केंद्र सरकारने केलेल्या बदलांमुळे अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळू शकते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भित्तिपत्रिकेचे कौतुक करताना, अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वतःचा सर्वांगीण विकास करावा असे मत व्यक्त केले.

सदर भित्तिपत्रिका तयार करण्यासाठी व सादरीकरणासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संदीप लोखंडे, प्रा. कुलदीप सूर्यवंशी व प्रा. किशोरी कोळपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.




Facebook Post Link