आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे
वाणिज्य विभाग आणि स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु कविता माणिक यादव ही Comapany Secretary झाल्याबद्दल डॉ अजितकुमार जाधव आणि डॉ राजाराम कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कविता यांनी Career Opportunities in Company Secretary या विषयावर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉ अजितकुमार जाधव आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ राजाराम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डॉ संदीप लोखंडे यांनी केले तर आभार प्रा. कुलदीप सुर्यवंशी यांनी मानले.